मुंबई, भारतीय T20 क्रिकेट संघाची विजयी परेड पाहण्यासाठी हजारो लोक दक्षिण मुंबईत जमले असताना, मुंबई पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी प्रवाशांना मरीन ड्राइव्हकडे जाणे टाळण्याचा सल्ला दिला.

T20 विश्वचषक विजेता संघ नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) ते वानखेडे स्टेडियमपर्यंत दोन तासांच्या खुल्या बस परेडमध्ये भाग घेणार आहे.

"वानखेडे स्टेडियमभोवती चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे, लोकांना विनंती आहे की मरीन ड्राइव्हकडे जाणे टाळावे," पोलिसांनी त्यांच्या एक्स हँडलद्वारे आवाहन केले.

दुपारी ३ वाजल्यापासूनच मरीन ड्राईव्हवर लोक जमू लागले आणि काही ठिकाणी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण यांनी आदल्या दिवशी मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियममधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.