नवी दिल्ली, तुरुंगात असलेले आमदार आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना त्यांच्या पटपरगंज विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी जारी करण्यास न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे, असे अधिकृत निवेदनात शनिवारी म्हटले आहे.

सध्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या सिसोदिया यांना कथित अबकारी धोरण घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली होती.

सिसोदिया यांनी खिचरीपूर गाव, पूर्व विनोद नगर, रिसेटलमेंट कॉलनी खिचरीपूर, रेल्वे कॉलनी आणि मांडवली येथील विकास कामांसाठी आमदार निधीतून ३ कोटी रुपये देण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती, असे निवेदनात म्हटले आहे.

विकास प्रकल्पांमध्ये खिचरीपूरच्या सात ब्लॉकमधील खुल्या जागेचे सुशोभीकरण, मयूर विहार फेज-2 मधील उद्यानाचा विकास, पॉकेट ए मधील प्रवेशद्वार आणि मयूर विहार फेज 2 मधील फिरनी मोड खिचरीपूर, पॉकेट-4 मधील बाउंड्री वॉल आणि ग्रील यांचा समावेश आहे. मयूर विहार फेज 1 चे, पश्चिम विनोद नगर येथील स्वाती पार्कचे सुशोभीकरण देखील केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.