मुंबई, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर केली.

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली.

ते म्हणाले, "मुंबईत काल रात्री पाऊस पडला. आम्ही सकाळी एक अधिसूचना जारी करून मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे."

मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे, असे मंत्री म्हणाले.

लोकल गाड्या 30-40 मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपारपर्यंत परिस्थिती सुधारेल, असे केसरकर यांनी सभागृहात सांगितले.