रविवारी पत्रकार परिषदेत, इहुसान यांनी सांगितले की, गाझामधील विनाशकारी हल्ल्यांमुळे इस्त्रायली नागरिकांवर बंदी घालण्याचे स्थानिक नागरिकांनी आवाहन केल्यानंतर आदल्या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली.

ते पुढे म्हणाले की, बंदी लागू करण्यासाठी सरकार कायदेशीर सुधारणा करेल आणि प्रक्रिया जलद करण्यासाठी एक विशेष समिती नेमण्यात आली आहे.

मालदीवमध्ये दरवर्षी 10 लाखांहून अधिक पर्यटक येतात त्यापैकी अंदाजे 15,000 पर्यटक इस्रायलचे असतात, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले.